बाहेर सगळं "All Well"आहे...
नुकताच #Netflix वर "#हबड्डी" नावाचा एक अतिशय निरागस "#मराठी चित्रपट" बघितला, आता "Netflix" आणि निरागस...concept घशात अडकते ना,पण तरीही निरागस हाच शब्द योग्य आहे या चित्रपटासाठी. एका 10 ते 12 वर्षाच्या,"speaking disabilities"असलेल्या मुलाची,"मन्या"ची गोष्ट यात खूपच समर्पक पणे चितारण्यात आली आहे.आई बापाविना पोरका असलेला हा लहानगा,आपल्या बोलक्या बाहुल्यांचे खेळ दाखवणाऱ्या काका बरोबर माळरानावरील एका "एकाकी"झोपडीत रहात असतो.गावकऱ्यांच्या मेहरबानीवर मोठा होत असलेल्या या मन्या कडे मात्र "#Life Skills"चा दुर्मिळ खजिना असतो.बिघडलेली कोणतीही वस्तू लीलया दुरुस्त करणारा हा मन्या स्पष्ट बोलता येत नसल्याने दिवसभर "मिटल्या तोंडानेच"गावभर फिरत असतो. आपण बोलण्यासाठी तोंड उघडल्यावर अडखळत निघणाऱ्या शब्दांमुळे गावातील लोकं, शाळेतील मुलं आपल्याला हसतात,खिल्ली उडवतात हे बघून मन्या स्वतःला अजूनच मिटून घेतो.आणि हीच केविलवाणी भीती मनात घेऊन तो आपल्याला चित्रपटात भेटत राहतो. एक दिवस शाळेत एका कबड्डी शिक्षकाचा प्रवेश होतो.मुलांना कब...