Posts

Showing posts from November, 2022

स्थलांतर(Migration)

 "Journal of Movement Ecology" मध्ये एक संशोधन प्रसिध्द झालेय.हे संशोधन आहे पक्ष्यांच्या थांबलेल्या स्थलांतरा (Migration) बद्दलचे.पक्षांचे स्थलांतर हा नेहमीच पक्षीप्रेमींसाठी कुतूहलाचा आणि संशोधनाचा विषय ठरला आहे.या स्थलांतरांना देखील हजारो वर्षांची परंपरा आहे. पण निसर्गसाखळी मध्ये "मनुष्यप्राणी"वगळता बाकी सारे प्राणी निसर्गनियम काटेकोरपणे पाळताना आपल्याला दिसतात.आणि माणसाच्या याच नियम न पाळण्याच्या वृत्तीमुळे निसर्गामध्ये पक्षांच्या एका प्रजातीचे स्थलांतर थांबले आहे. ही घटना आहे युरोप मधील "स्पेन" (spain) ची राजधानी "माद्रिद"(Madrid) या शहरातील आणि ही स्थलांतर थांबलेली पक्षांची प्रजाती आहे "श्वेत सारस"अर्थात #White Stork. माद्रिद शहराच्या बाहेर सुमारे 30km वर,रोज शहरात तयार होणारे "ओल्या कचऱ्याचे"ढीग हजारो ट्रक मधून आणून ओतले जातात.त्यामध्ये टाकून दिलेले "जंकफूड"(Junk food),"मांसाहारी पदार्थ"(Non-vegetarian food) यांचे प्रमाण 90% असते.हे कचऱ्याने भरलेले ट्रक डेपो मध्ये शिरताच शेकडो "white stork"

कन्यापूजन.

 कन्यापूजन नवरात्रीचे वेध लागले तसे अनघा च्या मनात आता येणारे दिवस आपले ऑफिस चे routine सांभाळून कसे manage करायचे याचे plannig सुरू झाले.तशीही अनघा "WLB"(work life balance)सांभाळण्यात अगदी तरबेज.साफसफाई,घरातले सामान, नऊ रंगाच्या साड्या-कुर्ती गोळा करायच्या, रात्री सोसायटी मधील गरबा ला हजेरी लावायची एक ना हजार गोष्टी.पण दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अनघा या साऱ्या गोष्टी लीलया हाताळनार होती. अगदी offece मधील presantaion आणि deadline इतक्याच कुशलतेने. आणि हो,या सगळ्यात महत्वाचे काम अष्टमी साठी कुमारिका शोधून आणि सांगून ठेवणे.अष्टमी आठवल्यावर अनघा ला मागच्या वर्षीचा प्रसंग डोळ्यासमोर आला.घरी कन्या पूजन साठी तिला कसे बसे दोन कुमारिका मिळाल्या.ऑफिस ला थोडी उशिरा येते सांगून अनघा ने घरी खीर पुरी उसळ अशी जय्यत तयारी करून ठेवली.मुलींना द्यायला तिने खास "girlish colour" गुलाबी आणि जांभळा, अशा रंगाच्या छोट्या purse सुद्धा आणून ठेवल्या.ठरलेल्या वेळेपेक्षा अर्धा तास उशिरा या दोन्ही कुमारिका आपापल्या आयांबरोबर जरा नाखुषीनेच आल्या.बहुतेक आधी दोन तीन ठिकाणी प्रसादासाठी जाऊन आल्या अस

नवरात्र आणि जयजेव जयजेव

 माझ्या लहापनी नवरात्री मध्ये आमच्या घरी देवीची आरती करायला एक बऱयापैकी वृद्ध जोडपे यायचे.तसे ते चाळी मध्ये ज्याच्या कडे घट बसलेले असतील त्या प्रत्येकाकडे जायचे.मळकट धोतर त्यावर त्याच रंगाचा सदरा आणि डोक्यावर तिरकी ठेवलेली गांधी टोपी,तीही बऱ्यापैकी धोतराच्या मळकट पणाशी स्पर्धा करणारी.उन्हाने रापलेला चेहरा आणि पान खाऊन खाऊन लाल झालेले दात ,अशा वेशातील आजोबा आणि त्यांना matching होईल अशी हिरव्या अथवा लाल सुती नऊवारी साडीतली ठेंगणी आज्जी. कपाळावर लाल ठसठशीत कुंकू आणि अंगावर मोजके दागिने.कधी कधी त्यांचा 8 /9 वर्षांचा नातू सुद्धा यायचा त्यांच्याबरोबर.तो बरोबर असला की आई मग त्याला भाजी पोळी अथवा काहीतरी खाऊ द्यायची. चाळीतील ठरलेल्या घरांसमोर उभे राहून संबळ च्या तालावर typical कमावलेल्या आवाजात ते दोघे आरती गायचे.प्रत्येक वर्षी नवरात्री मध्ये ती दोघे आमच्या घरासमोर 10 दिवस आरती म्हणायचे.पण इतक्या वेळेला ऐकून सुद्धा त्यातील "जयजेव जयजेव"एवढा एकच शब्द आम्हाला कळायचा. बाकी काय म्हणायचे ते त्यांचे त्यांनाच ठाऊक. त्यांनी चाळीत एन्ट्री केली की मी आणि बहीण आई ला ओरडून सांगायचो..आई "जय