Posts

Showing posts from December, 2022

इंटिरियर डिझाईन मध्ये रंगांचा वापर(#Role of different color in interior designing)Brown color

Image
   मागील ब्लॉग मध्ये आपण Red color हा नक्की कसा आहे आणि Interior designing मध्ये त्याचा  वापर आपण नक्की कशा प्रकारे करू शकतो हे बघितले (Link of Previous Blog) https://blogbyrutujanaik.blogspot.com/2022/12/role-of-different-color-in-interior.html मागील ब्लॉग पासून आपण अशा10 रंगांबद्दल बोलत आहोत जे interior designing मध्ये प्रामुख्याने वापरले जातात.यातीलच पुढील रंग आहे "Brown" लाल रंगाच्या "Vibrant" आणि "Energetic"स्वभावानंतर ब्राउन रंग आपल्याला भेटतो तो त्याच्या हलक्या आणि मृदू स्वभावाच्या स्वरूपात.लाल रंगापेक्षा हा रंग "Lighter" आणि "Softer"समजला जातो. "Brown color"हा "Earthy color"म्हणून ओळखला जातो.आपल्या आजूबाजुला तो आपल्याला अगदी झाडांच्या खोडांपासून (Trunks)ते मातीच्या(soil) विविध "shades"पर्यंत सगळीकडे आपल्या मूळ रुपात दिसतो. नारंगी (Orange) आणि काळा(black) हे दोन रंग एकत्र करून आपल्याला "Brown",रंग मिळतो. How can we use color "Brown"in interior designing Brown रंग आपण कुठे कुठे वाप

इंटिरियर डिझाईन मध्ये रंगांचा वापर(#Role of different color in interior designing)Red Color

Image
   इंटिरियर डिझाईन मध्ये रंगांचा वापर(#Role of different color in interior designing) मागील ब्लॉग मध्ये आपण इंटिरियर डिझाईनिंग (interior designing)मध्ये रंग ही संकल्पना (color scheme)किती महत्वाची भूमिका निभावते हे बघितले तसेच #color psychology बद्दल माहिती घेतली.(आधीच्या ब्लॉग ची लिंक आपल्या माहितीसाठी) https://blogbyrutujanaik.blogspot.com/2022/12/importance-of-colors-in-interior.html आता या ब्लॉग मध्ये आपण अशा 10 रंगांबद्दल जाणून घेऊया जे इंटिरियर डिझायनिंग (#interior designing)मध्ये प्रामुख्याने वापरले जातात तसेच त्यांचा मानवी मनावर(#human mind)वर काय परिणाम होतो.असे म्हटले जाते की "You are saying something with the color you choose",म्हणूनच interior designing मध्ये color selection काळजीपूर्वक करावे लागते.थोडक्यात सांगायचे झाले तर,"color choices can make or break your design" #Role of different colors in interior designing: लाल रंग(Red Color) रंग या संकल्पनेमधला (concept) सर्वात पहिला (basic color)रंग म्हणजे लाल रंग.काळा(black) आणि पांढरा(white)या नंतर रंगांच्या

इंटेरिअर डिझायनिंग मध्ये रंगांचे महत्व#importance of colors in interior designing.

Image
 कोणतीही जागा अथवा वस्तू पहिल्यांदा बघताना आपल्याला कोणती गोष्ट आकर्षित करत असेल तर ती म्हणजे त्या जागेची रचना(structure) आणि रंगसंगती(color scheme).#interior desigening ,मध्ये structure आणि color scheme या गोष्टी महत्वाची भूमिका निभावताना आपल्याला दिसतात.आजच्या या लेखामध्ये "रंगसंगती"(#color scheme)या interior desigening मधील अतिशय महत्त्वाच्या आणि #gamechanger पैलू बद्दल आपण माहिती करून घेऊ या. रंग म्हणजे काय(#What is colors) "रंग"हा आपल्या आयुष्याचा अतिशय महत्वाचा घटक आहे. कोणतीही सुंदर गोष्ट मग ती कितीही सुबक असली तरी रंगांशीवाय अपूर्णच आहे.आता रंग ही concept सोप्या भाषेत जाणून घेऊया.रंगांच्या या "रंगीत"दुनियेत लाल(रेड),पिवळा(yellow),आणि निळा(blue)हे primary colors आहेत तर नारंगी(orange),हिरवा(green) आणि  जांभळा(violet) हे secondary colors आहेत.याबरोबरच सहा #Tertiary colors सुद्धा आहेत जे या primary आणि secondary colors च्या mixing मधून तयार होतात.कोणत्याही रंगाच्या (Hue) primary आणि secondary color मध्ये जर पांढरा(white)रंग मिसळला तर आपल्याला जो रंग म

आठवणीतील प्राणी

 लहानपणी आमच्या कॉलनी मध्ये दोन गायी यायच्या.एक लाल रंगाची आणि दुसरी पांढऱ्या रंगाची.पांढरी गाय रंगाप्रमाणेच शांत आणि मृदू स्वभावाची होती,अगदी "गरीब गाय"  या संकल्पनेला जागणारी,तर लाल गाय मारकुटी आणि वाकड्या शिंगांची.या गाईचे एक शिंग तुटलेले होते तर दुसरे वाकडे वाढलेले.बहुतेक त्या कोणाच्या तरी पाळलेल्या गाई होत्या. तेव्हा "पाळीव प्राणी"अथवा आताच्या "भाषेत"pet animals ही संकल्पना, मोत्या,टिप्या अथवा टिल्या नावाचा गावठी कुत्रा,मन्या नावाचा एखादा बोका किंवा मनी नावाची मांजर इथपर्यंतच मर्यादीत असायची.कोणा कोणाकडे मीठु किंवा राघू अशा बाळबोध नावाचे बडबडे पोपट सुद्धा असायचे.त्यातही हा मोत्या अथवा मन्या चार पाच घरांचा किंवा कधी कधी आख्या गल्लीचा मिळून असा commen pet असायचा आणि तो सगळ्यांच्याच खाल्ल्या अन्नाला जागायचा. तर या दोन गाईंच्या गल्लीत यायच्या वेळा देखील साधारण ठरलेल्या असायच्या.आठवड्यातून दोन तीन दिवस तरी त्या गल्लीत हजेरी लावायच्या.पांढरी गाय सकाळी तर लाल गाय दुपारच्या निवांत वेळी चक्कर टाकायची.पांढऱ्या गाई ने गल्लीत एन्ट्री मारताच आम्हा पोरांची वरात तीच