इंटिरियर डिझाईन मध्ये रंगांचा वापर(#Role of different color in interior designing)Red Color

  इंटिरियर डिझाईन मध्ये रंगांचा वापर(#Role of different color in interior designing)

मागील ब्लॉग मध्ये आपण इंटिरियर डिझाईनिंग (interior designing)मध्ये रंग ही संकल्पना (color scheme)किती महत्वाची भूमिका निभावते हे बघितले तसेच #color psychology बद्दल माहिती घेतली.(आधीच्या ब्लॉग ची लिंक आपल्या माहितीसाठी)

https://blogbyrutujanaik.blogspot.com/2022/12/importance-of-colors-in-interior.html

आता या ब्लॉग मध्ये आपण अशा 10 रंगांबद्दल जाणून घेऊया जे इंटिरियर डिझायनिंग (#interior designing)मध्ये प्रामुख्याने वापरले जातात तसेच त्यांचा मानवी मनावर(#human mind)वर काय परिणाम होतो.असे म्हटले जाते की "You are saying something with the color you choose",म्हणूनच interior designing मध्ये color selection काळजीपूर्वक करावे लागते.थोडक्यात सांगायचे झाले तर,"color choices can make or break your design"

#Role of different colors in interior designing:


लाल रंग(Red Color)

रंग या संकल्पनेमधला (concept) सर्वात पहिला (basic color)रंग म्हणजे लाल रंग.काळा(black) आणि पांढरा(white)या नंतर रंगांच्या दुनिये मध्ये सर्वात आधी सामील झालेला रंग कोणता असेल तर तो म्हणजे लाल रंग.

हा रंग रक्ताशी(blood) संबंधित असल्यामुळे color family मध्ये सर्वात उत्साही आणि चैतन्यदायी (energetic) म्हणजेच "Vibrant"म्हणून ओळखला जातो.आणि लाल रंग पूर्णपणे मानवी भावनांचे(Human emotions)चे प्रतिनिधित्व करतो.हा रंग आपण बरेच ठिकाणी त्याच्या "Dark shade"अथवा Light Tint"सह वापरलेला बघतो.लाल रंग हा "Tint", "shade" किंवा "Tone"कसाही वापरला तरी तो एक Lovely आणि energetic atomsphere निर्माण करतो. म्हणूनच तर प्रेमाचे प्रतीक(Love symbol)म्हणून लाल आणि गुलाबी(pink) रंग जगभरात दिमाखाने मिरवत असतात.

लाल रंग कुठे वापरू शकतो(Use of Red color in interior)

लाल रंग त्याच्या वेगळ्या वेगळ्या Tone, Tint अथवा shade मध्ये तुम्ही आपल्या office, livingroom किंवा bedroom साठी वापरू शकता.commercial places वरती लाल रंगाचा वापर,नेत्रुत्व(Leadership),इच्छाशक्ती(Will power) आणि मैत्रीपूर्ण वातावरण(friendly atmosphere)या गोष्टींना चालना देतो. कोणत्याही व्यवसायामध्ये "Productivity"वाढविण्यासाठी याच वातावरणाची तर आवश्यकता असते ना.

हाच लाल रंग Living room मध्ये वापरला तर नातेसंबंध मैत्रीपूर्ण बनवतो तसेच "healthy communication"वाढविण्यासाठी देखील मदत करतो.आधी सांगितल्या प्रमाणे लाल रंग हा "प्रेमाचा"रंग असल्यामुळे त्याला सगळ्यात जास्त पसंती मिळते ती बेडरूम साठी.इथे हा रंग त्याच्या अनेक छटांमध्ये म्हणजेच Tint, tone अथवा shade मध्ये वापरण्यात येतो.पण लाल रंग हा मुळातच स्वभावाने "Aggressive"असल्यामुळे तो नुसताच त्याच्या छटांमध्ये वापरणे योग्य ठरत नाही,कारण लाल रंग त्याच्या मूळ रुपात,बघणाऱ्याच्या मनात सुडाची भावना वाढवतो तसेच Blood pressure वर देखील परिणाम करू शकतो.म्हणूनच मानवी भावना(Human emotions)शांत करण्यासाठी लाल रंगाचा वापर हा पांढरा(white) अथवा बेज(bedge)अशा शांत स्वभावाच्या (cool colors) रंगां सह करणे कधीही योग्य ठरते.उदाहरणार्थ, bedroom मध्ये जर एका भिंती ला लाल रंग वापरला तर बाकीच्या भिंती साठी "cool tone color" जसे की पांढरा(white),फिक्कट हिरवा(light green),किंवा फिक्कट पिवळा(light yellow) असे color वापरून निर्माण होणारी #color scheme तुम्ही visually balanced ठेऊ शकता,ज्यामुळे bedroom मधील वातावरण उत्साही ठेवण्याबरोबरच Blood pressure level देखील नियंत्रणात राहते.

लाल रंगाशी जोडलेल्या मानवी भावना(Emotions associated with the color Red)

आनंद, प्रेम, उत्कटता, इच्छा, लैंगिकता, संवेदनशीलता.(Joy,Love,Passion,Desire, Sexuality,Sensitivity)

 ऊर्जा, शक्ती, जोम, सामर्थ्य. (Energy,Power, Vigor,Strength)

 जिद्द, नेतृत्व, धैर्य, इच्छाशक्ती.(Determination, Leadership,Courage, Willpower)

क्रोध, द्वेष(Anger, Malice)

धोका, युद्ध.(Danger, War)

भूक(Hunger).

पुढील ब्लॉग मध्ये आपण "Brown" या रंगांबद्दल तसेच त्याच्या वापराबद्दल जाणून घेऊया.

(Link for previous blog)

https://blogbyrutujanaik.blogspot.com/2022/12/importance-of-colors-in-interior.html

Rutuja Naik

#Marathi blogger

#Interior Design




Comments

Popular posts from this blog

नवी पालवी नवी उमेद

इंटिरियर डिझाईन मध्ये रंगांचा वापर(#Role of different color in interior designing)Brown color

देजा वू #Deja Vu