स्थलांतर(Migration)

 "Journal of Movement Ecology" मध्ये एक संशोधन प्रसिध्द झालेय.हे संशोधन आहे पक्ष्यांच्या थांबलेल्या स्थलांतरा (Migration) बद्दलचे.पक्षांचे स्थलांतर हा नेहमीच पक्षीप्रेमींसाठी कुतूहलाचा आणि संशोधनाचा विषय ठरला आहे.या स्थलांतरांना देखील हजारो वर्षांची परंपरा आहे.

पण निसर्गसाखळी मध्ये "मनुष्यप्राणी"वगळता बाकी सारे प्राणी निसर्गनियम काटेकोरपणे पाळताना आपल्याला दिसतात.आणि माणसाच्या याच नियम न पाळण्याच्या वृत्तीमुळे निसर्गामध्ये पक्षांच्या एका प्रजातीचे स्थलांतर थांबले आहे.

ही घटना आहे युरोप मधील "स्पेन" (spain) ची राजधानी "माद्रिद"(Madrid) या शहरातील आणि ही स्थलांतर थांबलेली पक्षांची प्रजाती आहे "श्वेत सारस"अर्थात #White Stork.

माद्रिद शहराच्या बाहेर सुमारे 30km वर,रोज शहरात तयार होणारे "ओल्या कचऱ्याचे"ढीग हजारो ट्रक मधून आणून ओतले जातात.त्यामध्ये टाकून दिलेले "जंकफूड"(Junk food),"मांसाहारी पदार्थ"(Non-vegetarian food) यांचे प्रमाण 90% असते.हे कचऱ्याने भरलेले ट्रक डेपो मध्ये शिरताच शेकडो "white stork" त्यावर अक्षरशः तुटून पडतात.आणि त्यांच्या पांढऱ्या शुभ्र पंखांखाली तो गलिच्छ परिसर पूर्णपणे झाकला जातो,जणू ते ओंगळवाणे दृश्य लपवण्यासाठी कोणी पांढरी चादर च अंथरली आहे.

हे "white stork" माद्रिद शहरातच,नागरी वस्ती जवळ आठ ते दहा फुटांची लांबरुंद घरटी करून राहतात.पक्षी अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार,हजारो "plastic" पिशव्यांमधून रोज ओतल्या जाणाऱ्या ओल्या कचऱ्याच्या कुजण्यातून तेथे मिथेन वायू(Methane Gas) तयार होतो.आणि त्या उष्णते मूळे ती जागा उबदार होते.युरोप मधील जीवघेणी थंडी टाळण्यासाठीच हे पक्षी आत्तापर्यंत स्थलांतर करायचे.पण आता बसल्या जागीच त्यांना "ऊब" आणि "आयते"अन्न मिळायला लागल्यावर आपली नैसर्गिक सवय विसरून हे पक्षी "readymade junk food"वर ताव मारायला शिकलेत.

 "white stork" च्या या थांबलेल्या स्थलांतराचा परिणाम असा झाला की,ते आफ्रिकेमधील ज्या उबदार गवताळ प्रदेशाकडे(Warm Grasslands)स्थलांतर करायचे त्या प्रदेशांमध्ये कीटक आणि गोगलगाई (Snails) यांची संख्या भरमसाठ वाढली.आणि अशी परिस्थिती तेथील चराऊ प्राण्यांसाठी(#grazing animals) हानिकारक ठरत आहे.

हे असे होणे फक्त त्या प्राण्यांसाठीच नाही तर "White Stork" आणि त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी सुद्धा तेवढेच नुकसानकारक ठरत आहे.आतापर्यंत हजारो km चा प्रवास करणारे हे पक्षी आता घरटे ते कचराकुंडी असा जेमतेम 20 ते 30 km चा प्रवास करत आहे.त्यांना लागलेल्या या "आयतेपणा"च्या सवयी मुळे या पक्ष्यांच्या येणाऱ्या पिढ्या लांबवर उडण्याची आणि नैसर्गिक पणे अन्न शोधण्याची उपजत क्षमता गमावून बसतील हे अगदी नक्की.

विचार करा की पुढे कधी जर हे कचऱ्याचे ढीग तिथे ओतणे बंद झाले तर?...काय होईल या पक्ष्यांचे? 

हे असे निसर्गाच्या विरुद्ध जाऊन वागणे आयत्या गोष्टींची सवय लागणे हे त्या पक्ष्यांसाठीच नाही तर आपल्या सारख्या "so called progressed human"सांठी आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी सुद्धा तितकेच नुकसानकारक आहे.आपल्यानंतर आपण "Next Generation"साठी काय सोडून जाणार आहोत याचा विचार करायची वेळ नक्कीच आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे."आम्हाला लहानपणी मिळाले नाही तर आता आम्ही आमच्या मुलांना सगळी सुखं देणार,या भूमिकेत असलेली आमची पालकांची पिढी,जरा विचार करूया की आपण आपल्या मुलांसाठी "white stork"तर नाही बनत आहोत ना?

आपण संपूर्ण जग तर नाही बदलू शकत पण जिथे राहतो ती आपल्या आजूबाजू ची परिस्थिती अजून बिघडू न देणे एवढे तर करूच शकतो ना.दुसऱ्या ने काय करू नये यावर चर्चा करण्यापेक्षा आपण आपल्याला दिसणाऱ्या,उमजणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी सावरूया ना,आणि चांगले काही घडवू शकलो नाही तरी बिघडवण्यात हातभार लावण्याच्या पापातून थोडं मुक्त होऊया.

Rutuja Naik

#Marathi blogger

#Marathi blogs


Comments

Popular posts from this blog

नवी पालवी नवी उमेद

इंटिरियर डिझाईन मध्ये रंगांचा वापर(#Role of different color in interior designing)Brown color

देजा वू #Deja Vu