बाहेर सगळं "All Well"आहे...

 नुकताच #Netflix वर "#हबड्डी" नावाचा एक अतिशय निरागस "#मराठी चित्रपट" बघितला, आता "Netflix" आणि निरागस...concept घशात अडकते ना,पण तरीही निरागस हाच शब्द योग्य आहे या चित्रपटासाठी.

एका 10 ते 12 वर्षाच्या,"speaking disabilities"असलेल्या मुलाची,"मन्या"ची गोष्ट यात खूपच समर्पक पणे चितारण्यात आली आहे.आई बापाविना पोरका असलेला हा लहानगा,आपल्या बोलक्या बाहुल्यांचे खेळ दाखवणाऱ्या काका बरोबर माळरानावरील एका "एकाकी"झोपडीत रहात असतो.गावकऱ्यांच्या मेहरबानीवर मोठा होत असलेल्या या मन्या कडे मात्र "#Life Skills"चा दुर्मिळ खजिना असतो.बिघडलेली कोणतीही वस्तू लीलया दुरुस्त करणारा हा मन्या स्पष्ट बोलता येत नसल्याने दिवसभर "मिटल्या तोंडानेच"गावभर फिरत असतो. आपण बोलण्यासाठी तोंड उघडल्यावर अडखळत निघणाऱ्या शब्दांमुळे गावातील लोकं, शाळेतील मुलं आपल्याला हसतात,खिल्ली उडवतात हे बघून मन्या स्वतःला अजूनच मिटून घेतो.आणि हीच केविलवाणी भीती मनात घेऊन तो आपल्याला चित्रपटात भेटत राहतो.

एक दिवस शाळेत एका कबड्डी शिक्षकाचा प्रवेश होतो.मुलांना कबड्डीचे धडे देता देता हा शिक्षक मन्या ला नकळत एक #Life Lesson, देऊन जातो.बंद वर्गामध्ये मोकळा सोडलेला भला दांडगा उंदीर मुलांना पकडायला सांगताना हा मुरलेला कबड्डी मास्तर म्हणतो,"अरे घाबरता काय,पकडा तो उंदीर.भीती ही भुतं सगळं मनात असते, बाहेर सगळं "All Well "आहे,आणि तरीही भीती वाटलीच तर तिच्याकडे बघुन खदाखदा हसायचं.मग बघा भीती कशी ढुंगणाला पाय लावून पळून जाते."या एका वाक्यामुळे मन्या चा आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोन च बदलतो.

पूढे सरकणाऱ्या प्रत्येक सिन मधून मन्या ला कळत जाते की तो एकटाच नाही तर त्याच्या अवतीभोवती "so called normal"म्हणून वावरणारी सारीच माणसे या ना त्या प्रकारे "abnormal" च आहेत.कोणी अशाप्रकारे तर कोणी तशाप्रकारे.मनातच असणाऱ्या बोलण्याच्या भीतीवर तो छोटा जीव आपल्यापरीने मात करत राहतो आणि त्याला कळून चुकते की "Nobody is perfect",अगदी जिच्यासाठी सारा अट्टाहास मन्या करतो ती त्याची मैत्रीण देखील....आणि हे सत्य समजून पचवल्यावरच मन्या 'मोकळा मोकळा'होत जातो.

आपल्या सर्वांमध्ये देखील एक मन्या दडलेला असतो. आपण सगळेच मनात कोणत्या ना कोणत्या प्रकारची केविलवाणी भीती घेऊन जगत असतो.ही भीती,न्यूनगंड मग कशाचाही असू शकतो.वय,वजन,उंची,त्वचेचा रंग,केसांचा पोत, बोलली जाणारी भाषा,सामाजिक-आर्थिक परिस्थिती...अक्षरशः कशाचाही.पण बरेचदा हे सारे आपल्या मनातच असते,समोरच्याला त्याचे काही देणेघेणे सुद्दा नसते.प्रत्येकाकडे काहीतरी असते आणि प्रत्येकाकडे काहीतरी नसते.मग आहे ते साजरं करूया आणि नाहीये ते स्वीकारूया ना..मग सगळं कसं सोप्प होऊन जातं.हा असण्या नसण्याचा खेळ मनात रंगतो आणि तिथेच चालू राहतो.बाहेरच जग आपल्याच लयीत चालू राहते,त्याला तुमच्या मनात तुम्ही काय तोलताय याच्याशी काही देणेघेणे नसते.ज्या रंगाच्या "Shade"मुळे तुम्ही आतल्या आत स्वतःला मिटत राहता कदाचित तोच रंग 'घन सावळा' बनून बघणाऱ्याला खुणावत असेल...बघणाऱ्याने काय बघायचे आणि आपल्याला कुठल्या "फुटपट्टी"ने मोजायचे हा त्याचा प्रश्न, तो त्यालाच सोडवू देऊ या ना.आपण का स्वतःला विझवून घ्यायचे. प्रत्येक व्यक्ती स्वतःपुरती 'परिपूर्ण'असते.मग हे आपल्यापुरते 'परिपूर्ण असणे आपल्याच आनंदाचे कारण बनवूया.स्वीकारलं की सगळं कसं सोप्प होऊन जातं.आणि तसेही,भीती आणि भुतं मनातच तर असतात....बाहेर सगळं "All Well"आहे.


ऋतुजा नाईक

Rutuja Naik

#Marathi Fine Writting

#Life style

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

नवी पालवी नवी उमेद

इंटिरियर डिझाईन मध्ये रंगांचा वापर(#Role of different color in interior designing)Brown color

देजा वू #Deja Vu