Posts

स्थलांतर(Migration)

 "Journal of Movement Ecology" मध्ये एक संशोधन प्रसिध्द झालेय.हे संशोधन आहे पक्ष्यांच्या थांबलेल्या स्थलांतरा (Migration) बद्दलचे.पक्षांचे स्थलांतर हा नेहमीच पक्षीप्रेमींसाठी कुतूहलाचा आणि संशोधनाचा विषय ठरला आहे.या स्थलांतरांना देखील हजारो वर्षांची परंपरा आहे. पण निसर्गसाखळी मध्ये "मनुष्यप्राणी"वगळता बाकी सारे प्राणी निसर्गनियम काटेकोरपणे पाळताना आपल्याला दिसतात.आणि माणसाच्या याच नियम न पाळण्याच्या वृत्तीमुळे निसर्गामध्ये पक्षांच्या एका प्रजातीचे स्थलांतर थांबले आहे. ही घटना आहे युरोप मधील "स्पेन" (spain) ची राजधानी "माद्रिद"(Madrid) या शहरातील आणि ही स्थलांतर थांबलेली पक्षांची प्रजाती आहे "श्वेत सारस"अर्थात #White Stork. माद्रिद शहराच्या बाहेर सुमारे 30km वर,रोज शहरात तयार होणारे "ओल्या कचऱ्याचे"ढीग हजारो ट्रक मधून आणून ओतले जातात.त्यामध्ये टाकून दिलेले "जंकफूड"(Junk food),"मांसाहारी पदार्थ"(Non-vegetarian food) यांचे प्रमाण 90% असते.हे कचऱ्याने भरलेले ट्रक डेपो मध्ये शिरताच शेकडो "white stork"

कन्यापूजन.

 कन्यापूजन नवरात्रीचे वेध लागले तसे अनघा च्या मनात आता येणारे दिवस आपले ऑफिस चे routine सांभाळून कसे manage करायचे याचे plannig सुरू झाले.तशीही अनघा "WLB"(work life balance)सांभाळण्यात अगदी तरबेज.साफसफाई,घरातले सामान, नऊ रंगाच्या साड्या-कुर्ती गोळा करायच्या, रात्री सोसायटी मधील गरबा ला हजेरी लावायची एक ना हजार गोष्टी.पण दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अनघा या साऱ्या गोष्टी लीलया हाताळनार होती. अगदी offece मधील presantaion आणि deadline इतक्याच कुशलतेने. आणि हो,या सगळ्यात महत्वाचे काम अष्टमी साठी कुमारिका शोधून आणि सांगून ठेवणे.अष्टमी आठवल्यावर अनघा ला मागच्या वर्षीचा प्रसंग डोळ्यासमोर आला.घरी कन्या पूजन साठी तिला कसे बसे दोन कुमारिका मिळाल्या.ऑफिस ला थोडी उशिरा येते सांगून अनघा ने घरी खीर पुरी उसळ अशी जय्यत तयारी करून ठेवली.मुलींना द्यायला तिने खास "girlish colour" गुलाबी आणि जांभळा, अशा रंगाच्या छोट्या purse सुद्धा आणून ठेवल्या.ठरलेल्या वेळेपेक्षा अर्धा तास उशिरा या दोन्ही कुमारिका आपापल्या आयांबरोबर जरा नाखुषीनेच आल्या.बहुतेक आधी दोन तीन ठिकाणी प्रसादासाठी जाऊन आल्या अस

नवरात्र आणि जयजेव जयजेव

 माझ्या लहापनी नवरात्री मध्ये आमच्या घरी देवीची आरती करायला एक बऱयापैकी वृद्ध जोडपे यायचे.तसे ते चाळी मध्ये ज्याच्या कडे घट बसलेले असतील त्या प्रत्येकाकडे जायचे.मळकट धोतर त्यावर त्याच रंगाचा सदरा आणि डोक्यावर तिरकी ठेवलेली गांधी टोपी,तीही बऱ्यापैकी धोतराच्या मळकट पणाशी स्पर्धा करणारी.उन्हाने रापलेला चेहरा आणि पान खाऊन खाऊन लाल झालेले दात ,अशा वेशातील आजोबा आणि त्यांना matching होईल अशी हिरव्या अथवा लाल सुती नऊवारी साडीतली ठेंगणी आज्जी. कपाळावर लाल ठसठशीत कुंकू आणि अंगावर मोजके दागिने.कधी कधी त्यांचा 8 /9 वर्षांचा नातू सुद्धा यायचा त्यांच्याबरोबर.तो बरोबर असला की आई मग त्याला भाजी पोळी अथवा काहीतरी खाऊ द्यायची. चाळीतील ठरलेल्या घरांसमोर उभे राहून संबळ च्या तालावर typical कमावलेल्या आवाजात ते दोघे आरती गायचे.प्रत्येक वर्षी नवरात्री मध्ये ती दोघे आमच्या घरासमोर 10 दिवस आरती म्हणायचे.पण इतक्या वेळेला ऐकून सुद्धा त्यातील "जयजेव जयजेव"एवढा एकच शब्द आम्हाला कळायचा. बाकी काय म्हणायचे ते त्यांचे त्यांनाच ठाऊक. त्यांनी चाळीत एन्ट्री केली की मी आणि बहीण आई ला ओरडून सांगायचो..आई "जय

बाहेर सगळं "All Well"आहे...

 नुकताच #Netflix वर "#हबड्डी" नावाचा एक अतिशय निरागस "#मराठी चित्रपट" बघितला, आता "Netflix" आणि निरागस...concept घशात अडकते ना,पण तरीही निरागस हाच शब्द योग्य आहे या चित्रपटासाठी. एका 10 ते 12 वर्षाच्या,"speaking disabilities"असलेल्या मुलाची,"मन्या"ची गोष्ट यात खूपच समर्पक पणे चितारण्यात आली आहे.आई बापाविना पोरका असलेला हा लहानगा,आपल्या बोलक्या बाहुल्यांचे खेळ दाखवणाऱ्या काका बरोबर माळरानावरील एका "एकाकी"झोपडीत रहात असतो.गावकऱ्यांच्या मेहरबानीवर मोठा होत असलेल्या या मन्या कडे मात्र "#Life Skills"चा दुर्मिळ खजिना असतो.बिघडलेली कोणतीही वस्तू लीलया दुरुस्त करणारा हा मन्या स्पष्ट बोलता येत नसल्याने दिवसभर "मिटल्या तोंडानेच"गावभर फिरत असतो. आपण बोलण्यासाठी तोंड उघडल्यावर अडखळत निघणाऱ्या शब्दांमुळे गावातील लोकं, शाळेतील मुलं आपल्याला हसतात,खिल्ली उडवतात हे बघून मन्या स्वतःला अजूनच मिटून घेतो.आणि हीच केविलवाणी भीती मनात घेऊन तो आपल्याला चित्रपटात भेटत राहतो. एक दिवस शाळेत एका कबड्डी शिक्षकाचा प्रवेश होतो.मुलांना कब

संध्याकाळ...

 वेळ सायंकाळी 6 किंवा 6.30 ची.ठिकाण,एका उच्चवर्गीय परिसरातील एक "सुपरशॉपी". खण्यापिण्या पासून सौन्दर्य प्रसाधनांपर्यंत असंख्य वस्तूंनी अक्षरशः लडबडलेले ते दुकान,सधन आणि सुखवस्तू ग्राहकांनी देखील तेवढेच गजबजलेले होते."ऑफिस" मधून घरी जाता जाता रोजच्या गरजेच्या आणि काही सहज "दिसल्या म्हणून घेतल्या"अशा वस्तूंच्या खरेदीसाठी प्रत्येकाची लगबग चालू होती. तर अशा संध्याकाळी रोजचा भाजीपाला घेऊन,जाता जाता घरातील एक दोन वस्तू घेण्यासाठी मी देखील त्या गर्दीचाच एक भाग झाले होते.सासूबाई आत दुकानात गेल्यामुळे भाजीच्या अवजड पिशव्या सांभाळत मी बाहेरच उभी राहिले, गर्दीत असूनही काहीशी अलिप्तपणे. इतक्यात कुठूनतरी काहीश्या घाईघाई मध्ये "तो" अवतरला,त्या गर्दीशी पूर्णपणे "Mismatch" असलेला....काळपट रंगाची ढगळ पॅन्ट आणि कधी काळी पांढरा असलेला पण आता रंग ओळखण्याच्या पलीकडे गेलेला शर्ट घातलेला "तो",कदाचित "कामावरून" परतत असावा.सवयीचे असल्याप्रमाणे तो दुकानाच्या पायरीवर जाऊन उभा राहिला."सुपरशॉपी"असल्यामुळे दूध,दही,चीझ इत्यादी वस्तूंनी श

देजा वू #Deja Vu

 माझ्या घराच्या परिसरामध्ये एक Restaurent आहे Deja vu नावाचे.तिथून जाता येताना त्या नावाकडे नेहमी लक्ष जाते.वेगळे पणा मुळे ते नाव माझ्या चांगलेच लक्षात राहिले. मला प्रश्न पडला की या नावाचा अर्थ काय असेल?घरी जाऊन शोधुया असे ठरवून घरी आले आणि विसरून गेले....नेहमीप्रमाणे 😛    असेच दुपारी निवांत असताना मोबाईल हातात घेतला आणि "जागतिक स्तरावरचा लोकप्रिय Time Pass"असलेले FB उघडले.थोडेसे स्क्रोल केल्यावर खाली असलेल्या पोस्ट ने माझे लक्ष वेधले..."देजा वू" म्हणजे काय?मी दचकलेच,अरे गूगल "search history" वाचून तुम्हाला जाहिराती फेकून मारते तेव्हढे ठीक होते ,आता mind ही वाचायला लागले की काय?अरे देवा! एका news reportar च्या वरताण मन बडबडत असते दिवसभर,मग तर किती आणि काय काय दिसेल स्क्रीन वर😛 या विचारानेच घाम फुटला.    हे असे अनेकदा घडते,की आपण एखाद्या वस्तूचा अथवा व्यक्तीचा विचार करतो आणि अचानक तीच गोष्ट कुठेतरी दिसते,वाचनात येते अथवा त्याचा संदर्भ कोणाच्यातरी बोलण्यात येतो किंवा ती व्यक्तीच प्रत्यक्ष भेटते,आणि मग त्या व्यक्ती ला आपण उदारपणे शंभर वर्षांचे आयुष्य बहाल क

बालपण,समज आणि शिळी भाकरी

 आमच्या 80 च्या दशकात जन्मलेल्या पिढीचे बालपण सर्वार्थाने भन्नाट आणि तितकेच भाबडे देखील होते.अनेक अतर्क्य गोष्टींवर आमचा लगेच विश्वास बसायचा.आमच्या घरातले वडीलधारे देखील आमचे चौखूर उधळणारे बालपण धाकात ठेवण्यासाठी अनेक स्टोऱ्या आम्हाला बेमालूम पणे चिकटवायचे. आणि आमचा देखील त्यावर विश्वास बसायचा,पण असे का हे विचारायची हिम्मत व्हायची नाही.   आमच्या पिढी मध्ये कॉमन आणि तितकेच "लोकप्रिय"असलेले समज म्हणजे...फळाची बी गिळली तर पोटात झाड येते,एक साळुंकी दिसली तर दिवस वाईट जातो आणि दोन दिसल्या तर चांगला,कुठेही गाढव ओरडण्याचा आवाज ऐकला आणि स्वतःच्या डोक्याच्या केसांना हात लावला तर केस चांगले लांबसडक्क वाढतात.आणि सगळ्यात अतरंगी समज काय तर मेहंदी मध्ये चिमणी ची "शी"घातली की मेहंदी लालचुटुक रंगते...मग काय सणासुदीला मेहंदी लावण्याआधी आमचा मोर्चा गावातल्या वडाच्या पाराखाली जमायचा कारण तिथे असा "ऐवज" मुबलक असायचा.बाई कित्ती ते भाबडेपण.   आणि या सगळ्यावर वरताण,आम्हाला चिकटवून गळी उतरवलेली गोष्ट म्हणजे....तू आमचा/आमची नाहीचेस,तुला शिळ्या भाकरीच्या तुकड्यावर विकत घेतली आहे.पो

नवी पालवी नवी उमेद

 एक दिवस सकाळी माझे लक्ष वॉशिंग मशीन च्या स्टँड कडे गेले,बघते तर काय तिथे दोन इवलीशी हिरवी पाने एका नाजूक पांढऱ्या दांडीवर डोलत होती,तेही बाथरूम मध्ये....आश्चर्य आणि आनंद दोन्ही एकाच वेळी मनात प्रकटते झाले. आंनद अशासाठी की कोठेही रोपटे उगवलेले दिसले की साऱ्या विश्वाचा आनंद माझ्या एकटीच्या मनात गर्दी करतो...कारण झाडा-पेडांवर माझे नितांत प्रेम,आणि आश्चर्य अशासाठी की हे बाळ अंधारात आले कसे? अशाच संमिश्र भावनांमध्ये सँडविच झालेले माझे डोके खाजवत मी त्या बाळाचे निरीक्षण करायला त्याच्या जवळ जाऊन न्याहाळू लागले,बघूया या तरी कोणाचे बाळ आहे आणि इथे कसे आले...ना माती ना उजेड,होता फक्त थोडासा"ओलावा", तर निरीक्षणाअंती "कोण" आणि "कसे" या दोन्ही प्रश्नांची उत्तरे मिळाली.दोन तीन दिवसांपूर्वी भाजी साठी म्हणून मटकी ला मोड आणले होते,आणि ती ज्या कपड्यात बांधली होती तो कपडा धुताना त्यात राहिलेले एखादे बीज तिथे पडून अंकुरले होते...कोणतीही अनुकूल परिस्थिती नसताना. त्या इवल्याश्या रोपाची ती उमेद बघून मी ही त्याला तिथून अलगद उचलून एका कुंडी मध्ये जागा दिली, असे जोमाने वाढले म्हणू